गेवराई – पोलीस कर्मचारी लाच लुचपतच्या जाळयात

वाळू उपसा प्रकरणी संशयित आरोपीकडून जामिनासाठी आठ हजार रुपयाची लाच घेताना उमापुर चौकीचे हेड कॉन्स्टेबल सुनील राठोड यांना लाच लुचपत विभागाच्या पथकाने मंगळवारी दुपारी 2 वाजता चकलांबा पोलीस स्टेशनच्या गेटवर रंगेहाथ पकडले.

वाळू उपसा प्रकरणी संशयित आरोपीला जामिनासाठी 10000 रुपयाची मागणी करून तडजोड करून आठ हजार रुपये घेताना उमापुर चौकीचे हेडकॉन्स्टेबल सुनील राठोड यांना चकलांबा पोलिस स्टेशनच्या गेटवर आठ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. ही कारवाई लाचलुचपत संभाजीनगर विभाग पोलीस निरीक्षक संदीप राजपूत यांच्या पथकाने केली. या कारवाईमुळे हप्तेखोर पोलिस प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या