पोलिसांनी अटक केली… अन् नशीब फळफळले…जाणून घ्या नेमके काय झाले…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शहाण्या माणसाने पोलीस ठाण्याची आणि कोर्टाची पायरी चढू नये असे म्हणतात. मात्र ही म्हण एका तरुणीने खोटी ठरवली आहे. अमेरिकेतील एका तरुणीला पोलिसांनी चोरी केल्याप्रकरणी अटक केली होती. परंतु त्यामुळेतच तिचे नशीब उजळले आहे. सध्या ती तरुणी दरमहा लाखो रुपये कमावत आहे. सध्या सोशल मीडियावर तिची चर्चा सुरु आहे.

एबी न्यूमैन (28) असे या मुलीचे नाव आहे. ही तरुणी अमेरिकेची रहिवाशी आहे. एबीवर गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये दारूच्या नशेत एका दुकानातून चोरी केल्याचा आरोप होता. या प्रकरणी एबीला चार दिवस अटक केली होती. त्यावेळी एका लोकप्रिय इंस्टाग्राम अकांऊंटने तिचे तुरुंगातील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.त्यात ती खूप सुंदर दिसत होती. त्यामुळे एबीला हळूहळू प्रसिद्धी मिळू लागली आणि त्याच्या अकाउंटवरील फॉलोअर्सची संख्याही झपाट्याने वाढत गेली.

एबीचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. काही लोकांनी एबीचा फोटो पाहिल्यानंतर सोशल मीडियावर तिचा शोध सुरू केला. परंतु एबी तुरुंगात असल्यामुळे तिला याबबात काहीच कल्पना नव्हती. जेव्हा चार दिवसांनंतर एबी तरुंगाबाहेर आली तोपर्यत ती एक लोकप्रिय सुंदर गुन्हेगार बनली होती. एबी्च्या फोटोमुळे अकांउट धारकाला खूप पैसे मिळत होते. त्याचबरोबर एबीलाही प्रसिद्धी मिळाली. त्यामुळे एबीही दरमहा लाखो रुपये कमावत आहे.

एबीला या प्रसिद्धीमुळे आश्चर्य वाटले. ती म्हणाली की, अमेरिकेत, कोणत्याही कारणातून आपण पैसे कमवू शकतो. माझे बालपण फारच कठीण परिस्थितीत गेले. मला लैंगिक अत्याचार आणि अंमली पदार्थांच्या व्यसनाचा सामना करावा लागला. परंतु आता मी खूप पैसे कमवत आहे. मला दरमहा पाच हजार डॉलर म्हणजे सुमारे 4 लाख रुपये मिळतात. यातून मी घराचे भाडे भरते असे तिने सांगितले.

एबीला यापूर्वीही अटक करण्यात आली आहे. एप्रिल 2023 मध्ये फ्लाइटमध्ये झालेल्या भांडणामुळे ती सहा तास तुरुंगात राहिली. सप्टेंबरमध्ये तिचा गर्भपात झाला त्यामुळे तिला मानसिक त्रास सहन करावा लागला. यातूनच ती खूप मद्यपान करू लागली. मात्र गेल्याच वर्षी तिचे नशीब फळफळले. आता सध्या ती मॉडेलिंगक्षेत्रात काम करत आहे.