जीकेएन एरोस्पेसतर्फे नावीन्यपूर्ण उत्पादन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

जीकेएन एरोस्पेस ही जगातील अग्रगण्य बहुतंत्रज्ञान श्रेणी 1 चे एरोस्पेस पुरवठा करणारी कंपनी आहे. नुकतेच कंपनीने इलेक्ट्रिकल वायरिंग इंटरकनेक्शन सिस्टमसाठी एरोस्पेसने ग्राहकांना त्यांचे प्रथम उत्पादन पाठविले आहे. हे उत्पादन कोलिन्स एरोस्पेससाठी वायर हार्नेस असून बोईंग 787 ड्रीमलाइनरच्या एअर मॅनेजमेंट प्रणालीमध्ये काम करेल. जीकेएन एरोस्पेस लक्षणीय संख्येने महिला यंत्रचालक आणि अभियंत्यांची नियुक्ती करणार आहे तसेच त्यांना साइटवर प्रशिक्षण देखील देणार आहे. आजपर्यंत 30 व्यक्तींची टीम तयार केली आहे. जीकेएन एरोस्पेसने साइटमध्ये आणि त्यांच्या अत्याधुनिक उपकरणे आणि तंत्रज्ञानामध्ये 10 मिलियन्सची गुंतवणूक केली आहे.