
सामना ऑनलाईन । वॉशिंग्टन
गुगल पुन्हा एकदा वादात सापडले आहे. थर्ड पार्टी ऍप्सना गूगलकडून जीमेल अकाऊंटसाठी ऍक्सेस देण्यात येत असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. त्यामुळे तुमच्या जीमेल अकाऊंटमधील कुठलीही महत्वपूर्ण माहिती वाचली जाऊ शकते किंवा डाटा चोरी होऊ शकतो. त्यामुळे एखाद्या ऍपवर जाऊन दालने उघडताना अलाऊ किंवा लेटर असे दिसले तर जरा सावधान.
सीएनएनमनी या वृत्तवाहिनीने याबाबतचा धक्कादायक खुलासा केलासा आहे. या वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार गुगल आधीपासूनच थर्ड पार्टी ऍप्सला जीमेल अकाऊंटमध्ये ऍक्सेस देत आहे.
- थर्ड पार्टीला एखाद्याच्या जीमेलमध्ये ऍक्सेस देणे म्हणजेच त्याने जीमेलमध्ये घुसून आपल्याला हवी ती माहिती वाचण्याची परवानगी देणे.
- अशाप्रकारे ऍक्सेस देण्याने युजर्सच्या खासगी आयुष्यात ढवळाढवळ होण्याचा धोका असतो.
गुगलचे स्पष्टीकरण
अशाप्रकारे जीमेलमध्ये एखाद्या थर्ड पार्टी ऍप्सने घुसण्याला आळा घालण्याबाबत गुगल सातत्याने काम करत आहे. जीमेलबरोबर संबंध असणाऱया ऍप्सची गुगल तपासणी करत असल्याचे गूगल क्लाऊडच्या टॅस्ट ऍण्ड पॉलिसी विभागाचे संचालकांनी म्हटले आहे.































































