चिंता वाढली, गोव्यात सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाची ‘शंभरी’

582

गोव्यात सलग तिसऱ्या दिवशी शंभर पेक्षा जास्त कोरोनाचे रुग्ण सापडले. आज नव्याने बरोबर शंभर रुग्ण सापडले तर 74 जण बरे होऊन घरी गेले. मृतांचा आकडा नऊच असून राज्याच्या कानाकोपऱ्यात कोरोनाचा होत असलेला फैलाव आता चींतेची बाब बनली आहे.

गोव्यात आता पर्यंत 2 हजार 251 रुग्ण सापडले आहेत. त्यातील 1 हजार 347 रुग्ण बरे झाले आहेत.बरे होण्याचे प्रमाण समाधानकारक असले तरी दर दिवशी शंभरच्या आसपास रुग्ण नव्याने सापडत असल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण पहायला मिळत आहे.

राज्यात 895 रुग्ण उपचार घेत आहेत. हा आकडा गोव्याच्या लोकसंख्येच्या तुलनेत मोठा असल्याने त्याचा परिणाम सगळीकडे दिसू लागला आहे. राज्यात कोरोनाचा सामुदायिक प्रसार होण्यास कारणीभूत ठरलेल्या मांगोर हिलमध्ये आज देखील 66 रुग्ण आहेत./मांगोर हिलमुळे ज्याना कोरोना झाला अशांची संख्या 299 वर पोचली असून हे रुग्ण राज्याच्या कानाकोपऱ्यात पोचले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या