गोव्यात 136 रुग्ण आढळले, आतापर्यंतची विक्रमी वाढ

448

गोव्यात आज विक्रमी 136 रुग्ण सापडले.आजपर्यंत एका दिवसात आढळलेले हे सर्वाधिक रुग्ण आहेत.आज 51 जण बरे होऊन घरी गेले आहेत.राज्यात आता पर्यंत 2 हजार 39 रुग्ण आढळले असून त्यातील 1 हजार 207 बरे झाले आहेत.सध्या 824 जण उपचार घेत असून आठ जणांचा आतापर्यंत कोविडमुळे मृत्यू झाला आहे.

वास्को मधील मांगोर हिल मधील रुग्णांचा आकडा आज 62 वर आला.मांगोर हिल मधील रुग्ण कमी होऊ लागले असले तरी मांगोर हिलशी निगडीत रुग्णांची संख्या 286 वर पोचली असून हा आकडा वाढतच चालला आहे.मूरगाव तालुक्यात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात फैलाव होऊ लागला आहे.सडा येथे 78,बायणा येथे 85,न्यू वाडे येथे 68,झुवारीनगर येथे 106 आणि खारेवाडा येथे 42 रुग्ण असून मूरगाव मधील कोरोनाचा फैलाव रोखणे सरकार समोर आव्हान बनले आहे.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या साखळी मध्ये रुग्ण वाढू लागले असून आज तेथील आकडा 50 झाला आहे. पोलिस स्टेशनमधील कर्मचारी कोरोनाग्रस्त झाल्यामुळे फोंडयातील आकडा 32 वर गेला आहे.आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्या वाळपईत 12,उसगाव मध्ये 6 रुग्ण आढळले आहेत.कुडतरी मध्ये 32 रुग्ण असल्याने तेथील परिस्थिती चिंताजनक आहे.

राजधानी पणजीच्या आसपास ताळगाव,चिंबल मध्ये रुग्ण संख्या वाढत असून त्याचा परिणाम पणजी मनपाच्या कामावर होऊ लागला आहे.पणजी मनपाचे बरेच कामगार कामराभाट आणि चिंबल मधील असून त्यांनी कामावर येणे टाळावे,असे मनपाने त्याना कळवले असून त्याचा परिणाम मनपाच्या कचरा उचलवर होऊ लागला आहे.चिंबल मध्ये 54 रुग्ण असून कामराभाट, कुडका-शंकरवाडी,करंझळे,ताळगाव मधील रुग्ण वाढत असल्याने राजधानी पणजी मध्ये चिंतेचे वातावरण पसरले

काल कोविड हॉस्पिटल मध्ये उपचार घेत असलेल्या भाजप आमदाराची तब्बेत बिघडल्याची जोरदार चर्चा सुरु होती.आज त्यांची तब्बेत चांगली असून एम्सच्या डॉक्टरांचे मार्गदर्शन घेऊन त्यांच्यावर उपचार सुरु असल्याचे सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या