
2022 च्या विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गोव्यातील नागरिकांसाठी नोकरी आणि बेरोजगारीबाबत सात मोठय़ा घोषणा केल्या आहेत. 2022च्या विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन केजरीवाल यांनी गोव्यात सत्तेवर आल्यास नोकरीत स्थानिकांना 80 टक्के कोटा, प्रत्येक घरातील एका बेरोजगाराला नोकरी आणि 300 युनिट मोफत वीज देण्याच्या आश्वासनांची उधळण केली आहे.




























































