गोव्याच्या विरोधी पक्षनेत्यांकडून उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन

गोव्याचे विरोधीपक्ष नेते दिगंबर कामत यानी महाराष्ट्र विधानसेभेत आज 169 मतांनी विश्वासदर्शक ठराव जिंकल्याबद्दल महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन केले आहे.

मडगावचे आमदार दिगंबर कामत यानी ट्वीट करून उद्धव ठाकरे याना शुभेच्छा दिल्या असुन, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस तसेच इतर समविचारी पक्षांचा पाठिंब्याने घडलेले नवीन सरकार जनतेचा विश्वास लवकरच संपादन करेल व कॉमन मिनीमम प्रोग्रामप्रमाणे जनतेसाठी काम करेल असे म्हटले आहे.

आघाडीचे सरकार चालविताना अहंकार, हुकूमशाही वृत्ती, अतिमहत्त्वाकांक्षा बाजूला ठेवूनच सर्वाना बरोबर घेऊन पुढे जावे लागते. आत्मकेंद्रित व स्वार्थी धोरण ठेवणाऱ्यां बरोबर आघाडी सरकार घडूच शकत नाही. मी गोव्यात मुख्यमंत्री म्हणून काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारचे पाच वर्षे सरकार टिकवुन मुख्यमंत्री म्हणुन कार्यकाळ पूर्ण केला आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील नवीन सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल असा विश्वास कामत यांनी व्यक्त केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या