गोव्यात आज एका दिवसात रेकॉर्ड ब्रेक कोरोना रूग्णांची नोंद, बाधितांचा आकडा 3 हजार जवळ

617

गोव्यात आज एका दिवसात रेकॉर्ड ब्रेक 198 रुग्ण आढळून आले. फक्त 67 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण वेगाने वाढू लागल्याने मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आजपासून 10 ऑगस्ट पर्यंत रात्री 8 ते सकाळी 6 वाजे पर्यंत जनता कर्फ्यू आणि शुक्रवार 17 जुलै पासून 3 दिवस लॉक डाउन जाहिर केले आहे.

गोव्यात आतापर्यंत 2 हजार 951 रुग्ण सापडले असून त्यातील 1 हजार 674 जण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या 1 हजार 259 रुग्ण उपचार घेत असून कोविडमुळे 18 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात कोरोनाचा फैलाव होण्यास कारणीभूत ठरलेल्या मांगोर हिल मध्ये 78 रुग्ण असून मांगोर हिलशी निगडीत रुग्णांची संख्या 408 वर पोचली आहे.

मूरगाव तालुक्यात तर कोरोनाचा उद्रेक झाला असून कोरोनाचा फैलाव रोखण्यात सरकारला अपयश आले आहे.सडा येथे 98,बायणा येथे 124,न्यू वाडे 107,झुवारी नगर 157,खारेवाडा 86 असे मोठ्या संख्येने रुग्ण असून मृतांमध्येही जास्त करून मूरगावचेच रुग्ण आहेत.

वेर्णा येथील औद्योगिक वसाहती मध्ये कोरोना थैमान घालु लागला आहे. ट्यूलिप डायग्नोस्टिक मध्ये तब्बल 136 जणांना कोविडची लागण झाली आहे. याशिवाय मडगावमध्ये 16, केपेमध्ये 17, लोटलीत 26, चिंबलमध्ये 93, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या साखळीत 25, मोती डोंगरावर 7, फोंडयात 49, आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्या वाळपईत 19 तर उसगाव मध्ये 8, शिरोडयात 18, पेडण्यात 12, मंडूर येथे 13, धारबांदोडयात 11, कुंकळळीत 27, खांडोळ्यात 40, कुडतरीत 37, बाळळीत 42 असे राज्याच्या कानाकोऱ्यात कोविडचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढू लागले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या