
पश्चिम बंगालमधील दक्षिण 24 परगणा जिल्ह्यात एका बकरीने आठ पायांच्या पिल्लाला जन्म दिला आहे. अशा प्रकारचे पिल्लू जन्माला आल्याचे समजताच गावकऱ्यांनी त्या बकरीच्या मालकाच्या घरी गर्दी केली. मात्र ज्या बकरीच्या पिल्लाला पाहायला लोक जमा झाले होते ते पिल्लू जन्मानंतर पाच मिनिटं पण जगलं नाही.
बनगाव घाटातील बावड या गावातील सरस्वती नावाची महिला पशूपालन करते. त्या महिलेने कोंबड्या, बकऱ्या पाळलेल्या आहेत. या महिलेकडील एका बकरीने शुक्रवारी सकाळी दोन पिल्लांना जन्म दिला. मात्र त्यातील एक पिल्लू पाहून सरस्वती दचकल्याच. त्या पिल्लाला चार नाही तर तब्बल आठ पाय होते. मात्र हे पिल्लू जन्मानंतर पाच मिनिटातच दगावलं. पण या पिल्लाला पाहण्यासाटी सरस्वती यांच्या घराबाहेर गर्दी झाली होती.




























































