सोने पुन्हा उच्चांकावर, चांदीही चमकली

गेल्या काही महिन्यांपासून सोन्याच्या भावात सातत्याने वाढ होत आहे. शुक्रवारीही सोन्याच्या दरात 800 रुपयांची वाढ झाली आहे. सोने प्रति तोळा 1 लाख 3 हजार 420 रुपयांवर पोहोचले आहे. सोन्यापाठोपाठ चांदीच्या दरात सुद्धा मोठी वाढ झाली आहे. चांदीच्या भावात आज 1 हजार रुपयांची वाढ झाली असून चांदी प्रति किलोग्रॅम 1 लाख 15 हजार रुपयांपर्यंत पोहोचली आहे. 2025 या वर्षात आतापर्यंत सोन्याच्या भावात 25,666 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. तर चांदीच्या भावात 28,876 रुपये प्रति किलोपर्यंत वाढ झाली आहे. 31 डिसेंबर 2024 ला सोन्याचा भाव 76,045 रुपये होता. तर चांदीचा भाव 85,680 रुपये होता. 22 कॅरेट सोन्याच्या भावात 644 रुपये वाढ होऊन भाव 92,888 रुपयांवर पोहोचला आहे. तर जीएसटी जोडल्यानंतर सोन्याचा भाव 95 हजार 674 रुपयांपर्यंत पोहचतो.