सोने खरेदी करताय? मग ही बातमी तुमच्यासाठीच!

1296

सध्या तुळशीच्या लग्नानंतर लगीन सराईचा मोसम जोरदारपणे सुरू आहे. त्यामुळे अर्थात खरेदीला उधाण आलं आहे. त्यात प्रामुख्याने सोने खरेदी आलीच. सोने खरेदी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, सोन्याचे दर उतरण्याची चिन्ह आहेत.

सध्या सोन्याचे बाजारमूल्य 39 हजार रुपये प्रति तोळा आहे. पण, हीच किंमत काही काळाने 38 हजार होणार असून त्याहीपेक्षा घटण्याची शक्यता आहे. याचं कारण, हिंदुस्थानसह अनेक देशांमध्ये सोन्याचे दर वाढल्याने मागणी कमी झाली आहे. त्यामुळे सोन्याच्या किमतींवर दबाव वाढत आहे. तसेच आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांनी सोन्यातील गुंतवणुकीला प्राधान्य देणं कमी केलं आहे. त्यामुळे सोन्याच्या दरात वाढ होणं थांबलं आहे.

ही स्थिती अशीच राहिली तर सोन्याच्या किमती घटतील. काही तज्ज्ञांच्या मते लगीनसराई असूनही सोन्याच्या मागणीत म्हणावी तेवढी वाढ झालेली नाही. याचा अर्थ अनेक ग्राहक त्यांच्याकडे आधीच असलेल्या सोन्यातून नवीन दागिने घडवत आहेत. त्यामुळे बाजारात सोन्याचा पुरेसा पुरवठा होत असल्याने अधिक सोन्याची मागणी झालेली नाही. त्यामुळे ही घट 37,500 पर्यंतही जाऊ शकते किंवा आणखीही कमी होऊ शकते असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या