
सामना ऑनलाईन । पाटणा
बिहारमधील पाटणा शहरात एका दागिण्यांच्या दुकानातील हिऱ्याचे कानातले अचानक गायब झाल्याने त्या दुकानाच्या मालकाचे धाबे दणाणले होते. त्याने सर्व कर्मचाऱ्यांची चौकशी केली, दुकानात सगळीकडे शोधले मात्र कानातले न सापडल्याने आपले मोठे नुकसान झाले असे समजून तो निराश झाला. मात्र काही वेळाने त्याने दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले त्यावेळी त्यात कानातले हे दुकानातील उंदरांनी चोरल्याचे दिसले. त्यानंतर दुकानदाराने हताश व्हायच्या ऐवजी चक्क आनंदाने उड्या मारायला सुरुवात केली. उंदिर हा देवाचा दूत असून त्याने पार्वती देवीसाठी दागिने चोरल्याचा दावा त्या दुकानदाराने केला आहे.
धीरज कुमार असे त्या दागिण्यांच्या दुकानदाराचे नाव असून त्यांच्या दुकानातील हिऱ्याचे कानातले अचानक एकेदिवशी नाहिसे झाले. त्यांनी व कर्मचाऱ्यांनी हा देवभोळे असल्याने उंदिर म्हणजे देवाचा दूत असेच त्यांचे मानने आहे. उंदराने महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी दागिणे चोरून देवी पार्वतीला दिले आहेत, असा दावा धीरज कुमार यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्याने दुकानातील कर्मचारी व त्यांचे नातेवाईक हैराण झाले आहेत. तसेच उंदराने चोरलेले हिऱ्याचे कानातले परत जरी मिळाले तरी ते केदारनाथ येथे जाऊन दान करण्याचे त्यांनी ठरवले आहे.





























































