
गेल्या काही दिवसांपासून सोन्याचांदीच्या दरात घसरण होत असल्याने सोने चांदी स्वस्त झाले होते. मात्र, गुरुवारी सोन्याचांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. लग्नसराईचा काळ सुरू होणार असल्याने सोन्याचांदीच्या दरात वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली होती. त्याप्रमाणे आता सोन्याचांदीच्या दरात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे.
जागतिक अर्थव्यवस्था आणि शेअर बाजाराचा सोन्याचांदीच्या दरांवर परिणाम होत असतो. सध्या शेअर बाजारात चढउतार होत असल्याने सोन्याचांदीच्या दरातही बदल होत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सोन्याचांदीचे दर घसरत होते. आता गुरुवारी या दरात बदल झाले असून सोन्या चांदीच्या दरात वाढ झाली आहे. दररोज सोन्याचांदीच्या दरात बदल होत असतात. गुरुवारी जारी झालेल्या दरानुसार 10 ग्रॅम सोने 49 हजाराच्यावर पोहचले आहे. तसेच चांदीच्या दरातही तेजी आहे. एक किलो चांदीचे दर 66,348 वर पोहचले आहेत.
999 टक्के शुद्ध सोन्याची किंमत गेल्या 10 दिवसांच्या तुलनेत 769 रुपयांनी वाढली आहे. 10 ग्रॅम सोन्याची किंमत 49,140 रुपये झाली आहे. 995 टक्के शुद्ध सोन्याची किंमत 48,943 रुपये प्रति 10 ग्रॅम, 916 टक्के शुद्ध सोन्याची किंमत 45012 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 750 टक्के शुद्ध सोन्याची किंमत 36855 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली आहे. चांदीच्या दरात एका दिवसात 1792 रुपयांनी वाढ झाली असून 1 किलो चांदीचे दर 66,348 वर पोहचले आहेत.




























































