
सोन्याचांदीच्या दरात गेल्या काही दिवसांपासून घसरण होत होती. मात्र, बुधवारी सोन्या चांदीच्या दरात वाढ झाली आहे. सोन्याच्या किमतीत थोडीशी वाढ झाली असून चांदीच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून 61 हजार रुपये प्रतिकिलो असणारी चांदी बुधवारी 63 हजार रुपयांवर गेली आहे. तर सोन्याचे दर 10 ग्रॅमसाठी 48,204 रुपयांवर पोहचले आहेत.
सराफा बाजारात बुधवारी सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. 999 शुद्धतेचे सोने 10 ग्रॅमसाठी 48,204 रुपये, 995 शुद्धतेचे सोने 48,011 रुपये, 916 शुद्दतेच सोने 44,155 रुपये तर 750 शुद्धतेच सोन्याचे दर 36,153 रुपये असे झाले आहेत. त्याचप्रमाणे चांदीच्या दरात विक्रमी वाढ झाली असून 999 शुद्धतेची चांदी 63004 रुपयांवर पोहचली आहे.
गेल्या काही दिवसांपासून घट होणाऱ्या सोन्याचांदीच्या दरात बुधवारी वाढ झाली आहे. 999 आणि 995 शुद्धतेचे सोने मंगळवारच्या तुलनेत 82 रुपयांनी महागले आहे. तर 916 शुद्धतेच्या सोन्यात 75 रुपयांनी वाढ झाली आहे. मात्र, चांदीच्या किमतीत मंगळवारच्या तुलनेत विक्रमी वाढ झाली असून चांदीच्या दरात प्रतिकिलोसाठी 1402 रुपयांनी वाढ झाली आहे. जागतिक अर्थव्यवस्था आणि शेअर बाजाराचाही सोन्याचांदीच्या दरांवर परिणाम होत असतो. गेल्या दोन दिवसांपासून शेअर बाजारात घसरण होत असल्याने सोन्याचांदीच्या दरात वाढ झाल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
























































