सोन्या-चांदीच्या दराने गाठला उच्चांक, तोळ्याचा भाव वर्षअखेर 50 हजार पार जाण्याची शक्यता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगभरात कोरोनाचे थैमान सुरू आहे. अनेक देशात लॉकडाऊन लागू असल्याने बाजारपेठा ठप्प पडल्या आहेत, तसेच पर्यटन, कंपन्या बंद असल्याने आर्थिक व्यवहारही बंद आहे. जगावर ‘न भूतो’ आर्थिक मंदीचे सावट असतानाच सोने-चांदीचे दर ‘कोटीच्या कोटी उड्डाण’ घेत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दराने उच्चांक गाठला आहे. सोन्याचे दर 46 हजार 600 रुपये प्रति तोळा तर चांदीचा दर 43 हजार 500 रुपये किलो असा झाला आहे.

gold4

कोरोनामुळे जगभरातील इक्विटी बाजारात मोठ्या प्रमाणात घसरण झाल्यानंतर गुंतवणूकदारांनी सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली होती. महिन्याभरापूर्वी सोन्याचे वायदा प्रति औंस 1,400 डॉलरच्या आसपास होता, जो आता प्रति औंस 18,00 डॉलर झाला आहे. 2020 च्या अखेरपर्यंत सोन्याच्या किंमती 1,800 डॉलर प्रति औंस म्हणजेच साधारण 50,000 ते 55,000 प्रति तोळापर्यंत वाढण्याची शक्यता आहे.