
जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी चेन्नईतील वडिलोपार्जित घर विकले आहे. तामिळ अभिनेते आणि दिग्दर्शक सी. मणिकंदन यांनी पिचाई यांचे घर खरेदी केले आहे. या घराच्या विक्रीचा व्यवहार किती रुपयांना झाला याबाबतचे तपशील अद्याप समोर आलेले नाहीत. घराची विक्री होत असताना पिचाई यांच्या आई-वडिलांच्या डोळ्यात अश्रू होते. सुंदर पिचाई यांचे घर हे चेन्नईतील अशोक नगर भागात आहे. पिचाई यांचा जन्म चेन्नईतील असून त्यांचे शालेय शिक्षण येथेच झाले.




























































