
सध्याच्या जमान्यात माहितीसाठी आपण सर्वच गुगलवर अवलंबून असतो. पण तुम्हाला माहित्येय का, गुगल लपूनछपून हेरगिरी करतंय, तुमच्यावर पाळत ठेवतंय. गुगल केवळ युजर्सचा ब्राऊझिंग पॅटर्नच नव्हे, तर तुमच्या अन्य बऱयाच गोष्टींची माहिती गोळा करत आहे. याबाबतचा खुलासा प्रायव्हसीसंबंधित संस्थेने अहवालातून केला आहे.
गुगलने अलीकडेच फ्रेडरेटेट लार्ंनग ऑफ कोहार्टस् (फ्लॉक) नावाचे नवे तंत्रज्ञान सादर केले आहे. गुगल क्रोमने जेव्हा थर्ड पार्टी ‘कुकीज’ला बंदी घातली, तेव्हाच फ्रेडरेटेट लार्ंनग ऑफ कोहार्टस्ला लाँच करण्यात आले या फ्लॉकच्या मदतीने गुगल युजर्सच्या प्रत्येक कृतीवर लक्ष ठेवतंय.
जगभरातील युजर्सचा ब्राऊझिंग पॅटर्न काय आहे, यावर ‘फ्लॉक’च्या मदतीने गुगल पाळत ठेवत आहे. याआधी कुकीजच्या माध्यमातून युजर्सने कोणते पेज खोलले आहे, यावर लक्ष ठेवले जात होते.



























































