Goole Doodle – गुरु-शनीच्या महायुतीवर, गुगलचे खास डुडल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

21 डिसेंबर रोजी अवकाशात गुरू आणि शनि या दोन ग्रहांची महायुती घडत असताना ही अद्वितीय खगोलीय घटना गुगलने अनोख्या पद्धतीने साजरा केली आहे. गुगलने नासाच्या सहकार्याने सोमवारी खास डुडल केले. गुगलने डुडल साकारताना गुरु- शनिच्या मिलाफाला कार्टून म्हणून दाखवले. यामध्ये दोन ग्रह एकमेकांना हात पुढे करतात. त्यांच्यामध्ये पृथ्वी आणि बाजूला सौरमंडळातील अन्य ग्रह आहेत.

खगोलशास्त्राची आवड असणाऱयांसाठी सोमवारचा दिवस म्हणजे खास पर्वणी. या दिवसाची रात्र सर्वात मोठी असते. दर 20 वर्षांनी गुरु- शनीची युती होते. पण यावेळी दोघांतील अंतर खूपच कमी आहे. सुमारे 400 वर्षांपूर्वी म्हणजे 1623 साली अशी घटना घडली होती. त्याआधी 1226 सालीही हा योग जुळून आला होता. आता अशी घटना 24 व्या शतकात होईल.