मोठी बातमी! गुगल करणार डिजीटल इंडियात 10 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक

728

माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील जगप्रसिद्ध कंपनी असणाऱ्या गुगलने डिजीटल इंडियामध्ये 10 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. गुगलेच मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी सोमवारी ही घोषणा केली आहे.

गुगल फॉर इंडिया या कार्यक्रमाच्या अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला असून पुढच्या काही वर्षांत हिंदुस्थानात मोठी आर्थिक गुंतवणूक करण्यात येणार आहे. यात संस्थात्मक भागीदारी, इक्विटी गुंतवणूक, पायाभूत सोयीसुविधा तसेच डीजिटायझेशन अशा विविध आयामांचा समावेश आहे. त्यासाठी गुगल 10 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. पुढच्या पाच ते सात वर्षांत ही गुंतवणूक होईल, अशी माहिती सुंदर पिचाई यांनी दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या