गोरेगावला नाल्यात पडून दोघा कामगारांचा मृत्यू

307

गोरेगाव एमटीएनएल येथील नाल्यात पडून दोघा कामगारांचा मृत्यू झाला. अरुण कुमार पटेल (43) व मनोज गोस्वामी अशी मृतांची नावे आहेत. मंगळवारी दुपारी साडेतीन वाजता ही घटना घडली.  एमटीएनएल नाल्याजवळ कंत्राटी कामगारांमार्फत गटाराच्या सफाईचे काम सुरू होते. यावेळी हब मॉल समोरील गटारावरील झाकण उघडताना अरुण कुमार हा कामगार आठ फुल खोल गटारात पडला. त्याला वाचविण्यासाठी सहकारी मनोज कुमार आणि धर्मेंद्र राजभर पुढे आले. मात्र, मनोजचाही यावेळी तोल गेला आणि तो गटारात पडला. या घटनेची माहिती धर्मेश यांने वनराई पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोरीच्या सहाय्याने या दोघांना बाहेर काढले आणि पालिकेच्या ट्रामा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले, अशी माहिती वनराई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरिक्षक गितेंद्र भावसार यांनी दिली. याबाबत पुढील तपास सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या