गोरेगावात साकारतेय सुसज्ज नाटय़गृह; बांधकाम सुरू, मार्केटचीही पुनर्बांधणी

435

गोरेगावातील नाटय़प्रेमींसाठी शिवसेनेच्या प्रयत्नांमुळे नाटय़गृह उभारण्यात येणार आहे. 750 आसनव्यवस्था असलेले हे नाटय़गृह असून त्याच्या बांधकामास सुरुवात करण्यात आली आहे. या नाटय़गृहासोबतच टोपीवाला मार्केटचीही पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी नुकतीची या ठिकाणी भेट देत बांधकामाची पाहणी केली व आढावा घेतला.

 टोपीवाला मंडई जीर्ण झाल्यामुळे पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. त्याच ठिकाणी नाटय़रसिकांसाठी नाटय़गृह उभारण्यात यावे यासाठी शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी शासनाच्या नगरविकास विभागाकडे पाठपुरावा करून विशेष मंजुरी मिळवली.  मार्केटकरिता 200 हून अधिक गाळे तसेच 750 आसनांचे नाटय़गृह असा आराखडा वास्तुविशारद शशी प्रभू यांनी तयार केला आहे. महापालिकेने नाटय़गृहास अभिनेते प्रभाकर पणशीकर यांचे नाव देण्याचा प्रस्ताव मंजूर केला असून प्रत्यक्ष बांधकामासही सुरुवात झाली आहे. शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी या बांधकामाचा आढावा घेतला त्याप्रसंगी पालिकेचे सहाय्यक आयुक्त क्षीरसागर, मार्केट व बांधकाम विभागाचे अधिकारी तसेच शिवसैनिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या