आरक्षण देण्यास सरकार कटिबद्ध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
Maharashtra chief minister Devendra Fadnavis

सामना ऑनलाईन । मुंबई

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यामुळे मराठा समाज आक्रमक झाल्यानंतर आज दोन दिवसांनी अखेर मुख्यमंत्र्यांनी शांततेचे आवाहन केले. सकल मराठा समाजाशी आपण चर्चेस तयार आहोत. सरकार आरक्षण देण्यास कटिबद्ध आहे. मराठा समाजासाठी आखण्यात आलेल्या योजनांत त्रुटी असतील तर त्या दूर केल्या जातील. त्याचप्रमाणे नोकरभरतीत काही संभ्रम निर्माण झाला असेल तर तोही चर्चेने दूर केला जाईल, असे निवेदन मुख्यमंत्र्यांनी केले. काही राजकीय नेते परिस्थिती आणखी चिघळकून त्याचा राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांनी महाराष्ट्राच्या हितार्थ क्यापक भूमिका घेऊन प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी हातभार लाकाका, असे मुख्यमंत्री म्हणाले.