
सामना ऑनलाईन, लातूर
चाकूर तहसील कार्यालयामध्ये काम करणाऱ्या एका टंकलेखकाविरोधात (लिपीक) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. या लिपीकाविरोधात आरोप आहे की त्याने 4 हजार रूपयांची लाच मागितली होती. सातबाऱ्यामध्ये दुरुस्ती करण्यासाठी त्याने ही लाच मागितल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. परमेश्वर नारायणराव आगरकर (वय-37 वर्ष) असं या लिपीकाचे नाव आहे.
लाच मागितल्यानंतर परमेश्वरला आपली तक्रार केली जाईल आणि लाच मागितली म्हणून अटक होऊ शकते अशी भीती वाटली, ज्यामुळे त्याने लाच मागूनही ती स्वीकारली नाही असा आरोप तक्रारदारांचा आहे. यामुळे तक्रारदारांनी परमेश्वरविरोधात चाकूर पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने गुन्हा दाखल केला आहे. परमेश्वर याला अजून अटक करण्यात आलेली नाहीये.

































































