नेपाळमध्ये 27 विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना सरकारी नोकरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नेपाळमध्ये पंतप्रधान बालेन्द्र शाह यांनी सत्तेवर येताच धडाधड निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. नेपाळमध्ये सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या झेन-जी आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या 27 विद्यार्थ्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना सरकारी नोकरी देण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली. पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर झालेल्या मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या घोषणेनंतर तत्काळ ऊर्जा मंत्रालयाच्या अंतर्गत नेपाळ इलेक्ट्रिसिटी अ‍ॅथॉरिटीने भरती प्रक्रिया सुरू केली. प्रत्येक मृत विद्यार्थ्याच्या कुटुंबातील एका सदस्याला त्यांच्याच जिह्यात नोकरी दिली जाईल.