15 हजार पर्यंत पगार असलेल्या कर्मचार्‍यांचा सरकार भरणार  PF

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत 24 टक्के प्रोव्हिंड फंड केंद्र सरकार भरेल असा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाला आता ऑगस्टपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. आता केंद्र सरकार कर्मचार्‍यांना ऑगस्टपर्यंत प्रोव्हिंडड फंड भरणार आहे. त्यामुळे 72 लाख कर्मचार्‍यांना फायदा मिळणार आहे.

पंतप्रधान गरीब कल्याण योजनेनुसार ज्या कंपनीमध्ये 100 कर्मचारी आहेत. आणि 90 टक्के कर्मचार्‍यांना 15 हजार आणि त्यापेक्षा कमी पगार असेल त्यांचा पीएफ केंद्र सरकार देणार आहे. सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार ऑगस्टपर्यंत हा पीएफ जमा केला जाणार आहे.  केंद्र सरकार या योजनेनुसार 4 हजार 860 कोटी खर्च करणार आहे. त्यामुळे 72 लाख हून अधिक कर्मचार्‍यांना थेट लाभ होणार आहे.