केंद्र सरकारकडून सहा राज्यांच्या राज्यपालांच्या बदल्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

केंद्र सरकारने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या संमतीने सहा राज्यांच्या राज्यपालांच्या बदल्या केल्या आहेत. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, त्रिपुरा व पश्चिम बंगालचे राज्यपाल बदलण्यात आले आहेत.

मध्य प्रदेशच्या राज्यपाल असलेल्या आनंदीबेन पटेल यांच्याकडे आता उत्तर प्रदेशच्या राज्यपालपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. याआधी राम नाईक यांच्याकडे उत्तर प्रदेशचे राज्यपाल पद होते. पश्चिम बंगालचे राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांना हटवून त्यांच्या जागी जगदीप धनखड़ यांची निुयुक्ती करण्यात आली आहे. बिहारचे राज्यपाल लाल जी टंडन यांना मध्य प्रदेशची जबाबदारी दिली आहे. तर माजी भाजप खासदार रमेश बैस यांना त्रिपुराचे राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. तर बिहारच्या राज्यपालपदी फागू चौहान यांची निवड करण्यात आली आहे.