सरकारी कर्मचारी, पेन्शनरांची दिवाळी दणक्यात; वेतन 24 ऑक्टोबरलाच

1505

नोव्हेंबर महिन्यात होणारे वेतन आणि निवृत्ती वेतन ऑक्टोबरच्या 24 तारखेलाच करण्याचा सरकारने निर्णय घेतला असल्याने सरकारी कर्मचारी, पेन्शनरांची दिवाळी दणक्यात होणार आहे. या संदर्भात सरकारने कोषागार कार्यालयाला तसे आदेश जारी केले आहेत.

मोदी सरकारचे दिवाळी गिफ्ट, महागाई भत्त्यात 5 टक्के वाढ करण्याचा निर्णय

सरकारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि पेन्शनरांना दरमहा महिन्याच्या 1 तारखेला किंवा त्यानंतर वेतन अदा केले जाते. त्यासाठी सरकारने 1959 साली मुंबई वित्तीय नियम लागु केलेला आहे. दरम्यान यंदा दिवाळी सणाला 25 ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशीने प्रारंभ होणार आहे. या दिवाळीचा आनंद व्दिगुणीत करण्यासाठी सरकारने ऑक्टोबरचा नोव्हेंबर महिन्यात दिला जाणारे वेतन याच महिन्याच्या 24 ऑक्टोबरला करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सरकारी, निमसरकारी, जिल्हा परिषदा, पंचायत समिती, सरकारी आणि अनुदानित शैक्षणिक संस्था, कृषी विद्यापीठे, सर्व महाविद्यालये कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी वेतन दिले जाणार आहे. पेन्शनरांनाही दिवाळी पूर्वी पेन्शन दिली जाणार आहे.

अनेक शाळा, कार्यालयाकडुन आदेश धाब्यावर
सरकारने दिवाळीसाठी सर्व सरकारी कर्मचारी, शैक्षणिक संस्था कर्मचारी, शिक्षकांना 24 ऑक्टोबरला वेतन देण्याचे आदेश दिले असले तरी अनेक कार्यालय आणि शाळांकडुन हे आदेश धाब्यावर बसविले जातात. त्यामुळे काही कर्मचारी आणि शैक्षणिक संस्थाच्या कर्मचाऱ्यांना दिलेल्या तारखेत वेतन अदा होत नाही. यापुर्वीही सरकारने अशा प्रकारचा निर्णय घेतलेला होता, मात्र अनेक कर्मचाऱ्यांना आणि शिक्षकांना वेतन वेळत न मिळाल्याने त्यांच्या सणाच्या उत्साहावर विर्जन पडले होते. आता सरकारने दिलेले आदेशानुसार राज्यातील कर्मचारी आणि शैक्षणिक संस्थेत याची अंमलबजावणी होणार का, या प्रश्नाचे उत्तर 24 ऑक्टोबरलाच मिळणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या