पदवीधर, शिक्षकसाठी कोल्हापूरात सर्वाधिक मतदान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांसाठी सर्वत्र चुरशीने मतदान झाले. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक खबरदारी घेत मतदानाची प्रक्रिया पार पडली. दोन्ही मतदारसंघांत मतदानाच्या टक्केवारीत कोल्हापूर जिल्हा आघाडीवर राहिला आहे. ‘पदवीधर’मध्ये एकूण 49.52 टक्के मतदान झाले होते. यामध्ये 68.09 टक्क्यांसह कोल्हापूर जिल्हा आघाडीवर राहिला. तर, शिक्षक मतदारसंघातही एकूण 67.36 टक्के मतदान होऊन कोल्हापूर जिह्यात सर्वाधिक 86.77 टक्के मतदान झाले होते.