दूध, औषधाला पैसे नसल्याने आजीने तीन महिन्यांच्या नातीचा गळा घोटला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, कोल्हापूर

दूध आणि औषधाला पैसे कोठून आणायचे या चिंतेतून आजीने तीन महिन्यांच्या नातीचा गळा आवळून खून केल्याची भयंकर घटना समोर आली आहे. या घटनेने कोल्हापुरात खळबळ उडाली. पोलिसांनी आजीला अटक केली आहे. महोबतबी आदम मुल्ला असे अटक केलेल्या आजीचे नाव असून शिफाना असे तीन महिन्यांच्या दुर्दैवी बाळाचे नाव आहे.

शहरातील यादवनगर परिसरातील कोटीतीर्थ वसाहत येथील शब्बीर मुल्ला यांच्यासोबत शहनाज मुल्ला यांचा मे 2017 मध्ये विवाह झाला होता. तीन महिन्यांपूर्वी त्यांना एक मुलगी झाली. जन्मापासून ती अशक्त व आजारी असायची. त्यात शहनाज यासुद्धा अशक्त असल्याने तिच्या दुधावर बाळाचे पोट भरत नव्हते. त्यामुळे दूध पावडर आणून बाळाला पाजावी लागत होती. त्यासाठी नेहमी खर्च होत असल्याने सासू महोबतबी आदम मुल्ला या सुनेला सतत टोमणे मारत.

शनिवारी सकाळी सासू महोबतबी बाळाला घेऊन बाहेरच्या खोलीत बसली होती. बराच वेळ झाला तरी बाळाचा आवाज येत नसल्याने शहनाज हिने बाहेर येऊन पाहिले असता बाळ निपचित पडल्याचे तिला दिसले.

summary- grandma killed her own grand daughter