अर्ध्या मुंबईला ओटीटीचं वेड लागलंय!

मुंबई शहर हे नेहमी गजबजलेले असते. कधीही न झोपणारे शहर असे त्याचे वर्णन केले जाते. मुंबईकरांच्या झोपेबाबत एक सर्वेक्षण अहवाल नुकताच प्रकाशित झाला आहे. या अहवालानुसार निम्म्याहून अधिक मुंबईकर रात्री उशीरापर्यंत ओटीटी आणि सोशल मीडियावर वेळ घालवत जागे असतात.

वेकफिट.को या देशातील आघाडीच्या डी2सी स्लीप व होम सोल्युशन्स देणाऱया कंपनीने यावर्षीचा ग्रेट इंडियन स्लीप स्कोअरकार्ड सर्वेक्षणाचा अहवाल सादर केलाय. मार्च 2023 ते फेब्रुवारी 2024 या कालावधीत 10 हजार जणांनी या सर्वेक्षणात सहभाग नोंदवला. यात मुंबईतील झोपेचे ट्रेण्ड्स व पद्धतींबाबत रंजक माहिती समोर आली. साधारण 50 टक्के मुंबईकर रात्री 11 नंतर झोपतात. तसेच मुंबईतील 55 टक्के व्यक्तींना सकाळी उठल्यानंतर ताजेतवाने वाटत नाही.

32 टक्के लोकांना झोपेचा आजार

मुंबईतील 46 टक्के व्यक्ती रात्री 11 नंतर झोपतात. 89 टक्के मुंबईकर मध्यरात्री 1 ते 2 यावेळेत उठतात. त्यांच्या झोपेचा दर्जा खालावला आहे. 32 टक्के मुंबईकरांना झोपेच्या आजाराची लक्षणे आहेत, असे अहवालातून समजते.

90 टक्के करतात फोनचा अतिवापर

90 टक्के मुंबईकर झोपण्यापूर्वी पह्नचा नियमितपणे वापर करतात. या अहवालामधून निदर्शनास आले की 52 टक्के मुंबईकर रात्री उशिरापर्यंत जागे राहण्यामागे ओटीटी व सोशल मीडिया हे प्रमुख कारण आहे.

N मुंबईतील जवळपास 30 टक्के कर्मचारी कामानिमित्त रात्री उशिरापर्यंत जागे राहतात. तसेच, 57 टक्के मुंबईकरांना कामकाजाच्या वेळी थकल्यासारखे व झोप आल्यासारखे वाटते.

N 37 टक्के मुंबईकरांचा विश्वास आहे की झोपेच्या अगोदर डिजिटल डिवाईसेचा वापर न केल्यास उत्तम झोप मिळण्यास मदत होईल. तसेच, 28 टक्के मुंबईकरांनी दर्जेदार मॅट्रेस खरेदी केल्यास झोपेचा दर्जा सुधारू शकतो.