
सामना प्रतिनिधी, मुंबई
राष्ट्रीय हरित लवादाने भुयारी मेट्रो तीनच्या आरे येथील कारडेपोला हिरवा कंदील देत या प्रकरणात दाखल याचिका निकालात काढली आहे. वनशक्ती संस्थेने या डेपोला हरकत घेणारी याचिका दिल्ली येथील राष्ट्रीय हरित लवादासमोर दाखल केली होती. जुलै 2015 पासून या प्रकरणाची सुनावणी सुरू होती.
दिल्ली येथे झालेल्या अंतिम सुनावणीत आज राष्ट्रीय हरित लवादाच्या प्रमुख पीठाने अर्जदारांना अर्ज मागे घेण्यात यावा अन्यथा आदेश निर्गमित करून अर्ज निकाली काढण्यात येईल असे निर्देश दिले. त्यानंतर अर्जदार संस्था ‘वनशक्ती’ ने आपला अर्ज मागे घेतला आणि हे प्रकरण अंतिमतः निकाली निघाले. हरित लवादाने 14 मे रोजी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशला अंतिम आदेश होईपर्यंत सदर जागेत डेब्रिज टाकणे, भराव टाकणे आणि वृक्षतोड करणे यासाठी तात्पुरती मनाई केली होती.
summary-green signal for metro car shade


























































