
जम्मू कश्मीरच्या अनंतनाग येथील ग्रामपंचायतीवर दहशतवाद्यांनी केलेल्या ग्रेनेड हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये सरपंचाचाही समावेश असून चार जण जखमी झाले आहेत.
गेला काही काळ कश्मीरमध्ये अस्थिर वातावरण आहे. मंगळवारी सकाळी कश्मीर विद्यापीठाबाहेरच एक स्फोट झाला होता, तर कुलगाममध्ये एका सरकारी कार्यक्रमात आयईडीचा स्फोट झाला होता. त्यात काही जण जखमी झाले आहेत. अनंतनाग खेरीज हजरतबल दर्ग्याजवळही स्फोट झाला असून त्यात एक जण जखमी झाला आहे.
Jammu & Kashmir: The 2 civilians who were injured in a grenade attack in Panchayat Ghar Hakura, Anantnag, have succumbed to their injuries. https://t.co/UDC2SDc6NF
— ANI (@ANI) November 26, 2019
सोमवारी जम्मू-कश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात चार जणांना अटक करण्यात आली होती. विशेष पोलीस अधिकारी परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या काही तरुणांना धमकावल्याचा आरोप त्यांच्यावर होता. त्यांची झडती घेतल्यानंतर त्यांच्याजवळ ग्रेनेड सापडले होते.



























































