
व्यापाऱयांची तळी उचलून कष्टकरी कामगारांना देशाधडीला लावणाऱया ग्रोसरी बोर्डातील कर्मचाऱयांना माथाडी कामगारांनी जोरदार धडा शिकविला. कामगारांनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन करण्याऐवजी फक्त उडवाउडवीची उत्तरे देणाऱया दोन कर्मचाऱयांना संतप्त कर्मचाऱयांनी चोपले.
मुंबईत काम करणारे माथाडी कामगार आज ग्रोसरी बोर्डात आपल्या अनेक तक्रारी घेऊन आले होते. या कामगारांचा पगार गेल्या काही महिन्यांपासून निघालेला नाही. हे कामगार ज्या व्यापाऱयांकडे काम करतात. त्यांनी त्यांच्या रोजंदारीचे पैसे बोर्डाकडे जमा केलेले नाहीत. तरीही बोर्डाच्या अधिकाऱयांनी आणि कर्मचाऱयांनी त्यांच्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही. याबाबत या कामगारांनी कर्मचाऱयांवर प्रश्नांचा पाऊस पाडला. मात्र कर्मचाऱयांनी त्या प्रश्नांचे निरसन करण्याऐवजी ते सर्व उडवून लावले. त्यामुळे चिडलेल्या कामगारांनी मग्रुरी करणाऱया दोन कर्मचाऱयांना मारहाण केली.




























































