रिक्षा चालक मिटरप्रमाणे भाडे आकारत नाही? मग ‘या’ नंबरवर तक्रार नोंदवा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

रत्नागिरीत जिल्ह्यात रिक्षा भाडेवाढ करण्यात आली असून रिक्षाव्यवसायिकांनी नियमित दरापेक्षा अधिक भाडे आकारले प्रवाशांनी तक्रार करावी असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. दुरध्वनी क्रमांक 02352-229444 या क्रमांकावर वाहन क्रमांकसह तक्रार नोंदवावी, तसेच पोस्ट कार्डद्वारेही तक्रार स्विकारण्यात येतील याची सर्व प्रवाशांनी नोंद घ्यावी, असे आवाहन उपभाडे निश्चीती करताना करण्ता आले.

रिक्षा चालक मालक यांना भाडे मिटरप्रमाणे रिक्षा भाडे आकारण्याची तसेच प्रवाशांनाही त्याबाबत काही तक्रार असल्यास ई-मेल, पोस्टद्वारे, टोल फ्री क्रमांकावर कळविण्याचे आवाहन करण्यात आले हाते. यानुसार रिक्षा चालक हे मिटरप्रमाणे रिक्षा भाडेदर आकारणी करत नसल्याबाबत तक्रारी कार्यालयात प्राप्त होत आहेत. तरी रत्नागिरी जिल्हयातील सर्व रिक्षा चालक व मालक यांनी प्रवाशांकडून मिटरप्रमाणे रिक्षा भाडे आकारावे. मिटरप्रमाणे रिक्षा भाडे न आकारणाऱ्या रिक्षा चालकांच्या विरोधात उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, रत्नागिरी मार्फत विशेष रिक्षा तपासणी मोहीम नजिकच्या काळात राबविण्यात येणार आहे. तसेच सर्व नागरिकांनीही रिक्षा प्रवास करताना मिटरप्रमाणे भाडे द्यावे, जादा भाड्याची मागणी करणाऱ्या, तसेच भाडे नाकरणाऱ्या रिक्षा चालकांच्या विरोधात याकार्यालयाच्या टोल फ्री दुरध्वनी क्रमांक 02352-229444 या क्रमांकावर वाहन क्रमांकसह तक्रार नोंदवावी, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.