
कधी कोण कुठचा विक्रम करेल सांगता येत नाही. नुकताच एका व्यक्तीने एक लिटर टॉमेटो सॉस एका दमात पिऊन नवा विक्रम केला आहे. जर्मनीचा आंद्रे ऑर्टोल्फ असे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करणाऱया इसमाचे नाव असून त्याने 55.21 सेपंदांमध्ये एक लिटर टोमॅटो सॉस पिण्याची करामत केली.
गिनीज बुकच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर 25 डिसेंबर रोजी हा व्हिडीओ शेअर करण्यात आला. आतापर्यंतची ही सॉस पिण्याची सर्वाधिक जलद गती आहे, अशी व्हिडीओची माहिती देण्यात आली आहे.
व्हिडीओमध्ये असं दिसतंय की, आंद्रेने काचेच्या पारदर्शक अशा एका मोठय़ा जारमध्ये एक लिटर सॉस ओतून घेतलेला आहे. वेळ सुरू करताच त्याने सॉसमध्ये ठेवलेल्या स्ट्रॉच्या साह्याने हा विक्रम केला आहे. एकदाही थांबला नाही, त्याने एका दमात सॉस फस्त केला. आंद्रेच्या नावावर अन्यही विक्रम आहेत. एका मिनिटात चॉप स्टिक्सच्या मदतीने सर्वाधिक जेली खाणे, एका मिनिटात सर्वाधिक दही खाणे, 30 सेपंदांमध्ये सर्वाधिक सूप पिणे, असे विक्रम त्याने स्वतःच्या नावावर केले आहेत.
























































