मिरवणुकीत चोरांची हातसफाई, गुजरातच्या टोळीच्या मुसक्या आवळल्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लालबागमध्ये गणपती विसर्जनासाठी गुरुवारी उसळलेल्या गर्दीचा फायदा घेत चोरांनी सोनसाखळी व मोबाईलवर हात मारला. जवळपास 85 मोबाईल लांबविण्यात आले. पण काळाचौकी पोलिसांनी ऑन द स्पॉट 16 चोरांना रंगेहाथ पकडले. त्यातील सात जणांची टोळी अहमदाबादची निघाली. त्यात एका महिलेचा समावेश आहे.

लाडक्या गणरायांना निरोप देण्यासाठी लालबाग परिसरात नागरिकांनी गुरुवारी तोबा गर्दी केली होती. या गर्दीत चोरांनीदेखील शिरकाव केला होता. त्यांनी संधी साधत लोकांच्या खिशातले मोबाईल तसेच सोनसाखळय़ा लांबवल्या. काळाचौकी पोलीस ठाण्यात 85 मोबाईल व सोनसाखळी चोरीप्रकरणी  13 गुह्यांची नोंद झाली आहे. त्यापैकी 11 गुन्हे उघडकीस आणून तीन लाख 96 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. चोरांमध्ये सात जण गुजरातच्या अहमदाबादचे तर काही मुंबई-ठाण्यातले चोर असल्याचे निष्पन्न झाले. काळाचौकी पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.