लातूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लातूर शहर आणि जिल्ह्यात आज अचानक वातावरणात बदल होऊन वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. काही ठिकाणी तुरळक गारपीठ झाली.

निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी व परिसरात विजेचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. कोतलशिवणी आणि परिसरात जोरदार वाऱ्यासह गारपीठ झाली. यामुळे आंब्याचे नुकसान झाले. त्याचप्रमाणे जनावरांचा चारा भिजून खराब होत आहे. उदगीर तालुक्यातील गुडसूर परिसरात जोरदार स्वरुपाचा पाऊस झाला.

हेर आणि आजूबाजूच्या परिसरातही वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. औसा तालुक्यातील देवंग्रा परिसरात सोसाट्याच्या वाऱ्यासह तासभर हलक्या, मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत होता. जळकोट तालुक्यातही वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. लातूर शहरातही रिमझिम पाऊस झाला. या पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे आंब्यांचे नुकसान झाले.