Hair Care – केसातील कोंडा कमी होण्यासाठी हा पर्याय आहे सर्वात उत्तम, वाचा सविस्तर

पावसाळ्यात आपल्या केसांची काळजी घेण्याकडे खास लक्ष द्यायला हवे. पावसात केस भिजल्यामुळे, केसगळती फार मोठ्या प्रमाणात होते. म्हणूनच पावसाळ्यात आपल्याला केसांच्या आरोग्याची काळजी घेणे खूप गरजेचे आहे.

केसांमध्ये कोंड्याची समस्या ही प्रदुषणामुळे वाढते. त्यामुळे केसांची काळजी घेण्यासाठी नैसर्गिक उपचार म्हणून मेंदीचा वापर केला जातो. मेंदीचा वापर आपल्याकडे फार पूर्वापार केला जात आहे. नैसर्गिक घटक असलेली मेंदी ही केसांच्या पोषणासाठी कायम गरजेची आहे. कुठलेही केमिकलयुक्त घटक केसांना हानिकारक ठरतात. परंतु मेंदी मात्र केसांसाठी कायमच गुणकारी ठरलेली आहे.

मेहंदी आपल्याला कोंड्यापासून मुक्त होण्यास मदत करू शकते. अलीकडे बहुतेकजण कोंड्यामुळे त्रस्त आहेत. डोक्यातील कोंडा ही एक जुनी समस्या आहे.

डोक्यातील कोंड्यावर उपचार करण्यासाठी नैसर्गिक उपाय म्हणून केवळ एकच नाव ते आहे मेहंदी. मेंदीने तुम्ही अनेक प्रकारचे हेअर मास्क बनवू शकता.

Hair Care – आता केसगळतीवर हमखास जालीम उपाय, फक्त 15 रुपये होईल खर्च! केसही होतील घनदाट

नारळाचे तेल, लिंबाचा रस आणि मेंदीचा हेअर पॅक –

एका वाडग्यात चार चमचे मेंदी पावडर घ्या आणि त्यात थोडे खोबरेल तेल घाला. तसेच एक चमचा ताज्या लिंबाचा रस घाला आणि सर्व साहित्य एकत्र करा. हा हेअर पॅक केसांवर लावा. 30-45 मिनिटे तसेच ठेवावे. त्यानंतर धुण्यासाठी सौम्य शैम्पू वापरा. त्यानंतर कंडिशनर देखील लावा. हा मेंदीचा हेअर पॅक आठवड्यातून एकदा वापरल्यास उत्तम.

 

मेंदीचा सर्वात लोकप्रिय वापर हा केसांना रंग देण्यासाठी केला जातो. पांढरे केस रंगवण्याव्यतिरिक्त मेंदीचे केसांसाठी इतर अनेक फायदे आहेत.

 

मेंदीमुळे केसांना योग्य ते पोषण मिळते. तसेच मेंदीमुळे केसांना कुठलीही हानी पोहोचत नाही. त्यामुळे महिन्यातून किमान एकदा मेंदी वापरणे हे हितावह आहे.

(कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)