ओसामाचा मुलगा हमजाचा खात्मा

564

ओसामा बिन लादेनचा मुलगा तसेच आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हमजा बिन लादेन हा एका कारवाईत मारला गेला. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी आज या वृत्ताला दुजोरा दिला. पाकिस्तान तसेच अफगाणिस्तानच्या सीमाभागात दहशतवादविरोधी मोहिमेत अमेरिकेने केलेल्या हल्ल्यात हमजा याचा मृत्यू झाल्याचा दावा अमेरिकेच्या लष्करी अधिकाऱ्यांनी केला होता. अमेरिकेने स्पेशली डेजिगनेटेड इंटरनॅशनल टेररिस्टच्या यादीतही हमजाचे नाव दाखल केले होते. ओसामा बिन लादेनच्या मृत्यूनंतर अल कायदाची सर्व सूत्रे हमजाने हाती घेतली होती. अखेर हमजा ठार झाल्याचे वृत्त व्हाईट हाऊसने जारी केलेल्या एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

दहशतवाद्यांविरोधात केलेल्या कारवाईत हमजा नेमका केव्हा ठार झाला याबाबत माहिती देण्यात आलेली नाही परंतु हमजाच्या मृत्यूमुळे केवळ अल कायदाचेच नुकसान झाले नाही. तर आतंकी संघटनांच्या कारवाईवरही त्याचा परिणाम होणार असून दहशतवादविरोधी कारवाईला मिळालेले हे मोठे यश असल्याचे ट्रम्प यांचे म्हणणे आहे.

आपली प्रतिक्रिया द्या