हनुमा विहारीच्या नावावर आहे खास विक्रम, सचिन-विराट जवळपासही नाही

20

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

इंग्लंडविरुद्ध अखेरच्या कसोटी सामन्यासाठी हैदराबादचा अष्टपैलू खेळाडू हनुमा विहारीला संघात स्थान देण्यात आले आहे. हार्दिक पांड्याला बाहेरचा रस्ता दाखवत हनुमा विहारीला संघात घेण्यात आले आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडणाऱ्या हनुमा विहारीच्या नावावर एक असा विक्रम आहे ज्याच्या जवळपासही विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर पोहोचलेले नाही.

IND VS ENBG : हैदराबादचा ‘लक्ष्मण’ हनुमा विहारीचे कसोटीत पदार्पण

हनुमा विहारी प्रथम श्रेणी क्रिकेटमधील एका विशेष क्लबमध्ये समाविष्ट होणारा खेळाडू आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वाधिक सरासरी असणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो 10 व्या क्रमांकावर आहे. या यादीत ऑस्ट्रेलियाचे महान फलंदाजी सर डॉन ब्रॅडमन हे पहिल्या स्थानावर असून त्यांनी 234 प्रथम श्रेणी सामन्यात 95.14 च्या सर्वोत्तम सरासरीने 28067 धावा चोपल्या आहेत. हनुमा विहारीने 63 सामन्यात 59.79 च्या सरासरीने 5142 धावा केल्या आहेत. यात त्याच्या 15 शतकांचा समावेश आहे.

या यादीमध्ये दुसऱ्या स्थानावर हिंदुस्थानचेच विजय मर्चेंट आहे. त्यांची प्रथम श्रेणी क्रिकेटमधील सरासरी 71.64 एवढी आहे. त्यानंतर चौथ्या स्थानावर अजय शर्मा हे आहेत. त्यांनी 67.46 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. महान फलंदाज आणि क्रिकेटमध्ये विक्रमांचा डोंगर उभारणारा सचिन तेंडुलकर 14 व्या क्रमांकावर आहे. तर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली या यादीत पहिल्या 40 खेळाडूंमध्येही नाही. तो या यादीत 44 व्या स्थानावर आहे. विराटने 100 प्रथम श्रेणीच्या सामन्यात 53.97 च्या सरासरीने 8043 धावा केल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या