आळंदीत माऊली मंदिरासह विविध ठिकाणी हनुमान जन्मोत्सव साजरा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आळंदी येथील माऊली मंदिर, शनि मारुती मंदिर, कला मारुती , श्री मारुती देवस्थान तसेच हजेरी मारुती मंदिरासह आळंदी पंचक्रोशीतील विविध ठिकाणच्या श्री हनुमान मंदिरात सधेपणाने हुनमान जयंती साजरी करण्यात आली. प्रथापरंपरेप्रमाणे कोरोनाच्या निर्देशांचे पान करत मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला.

येथील विविध मठ, मंदिरे आणि धर्मशाळा तसेच परिसरातील पंचक्रोशीत श्री हनुमान जन्मोत्सवाचे सोहळ्यात श्रीचे जीवन चरित्रावर आधारित नामवंत कीर्तनकार, महाराज मंडळींची कीर्तन सेवा झाली. भाविक नागरिकांविना यावर्षी मोजक्याचा लोकांत श्री हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला. हजेरी मारुती मंदिरातील जन्मोत्सवानिमित्त मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली होती. आळंदी माऊली मंदिर,शनि मारुती मंदिर व हजेरी मारुती मंदिरात पुष्पसजावट लक्षवेधी ठरली.

माऊली मंदिरातील प्रथांचे पालन करीत हरी भक्त परायण बाळासाहेब महाराज शेवाळे यांचे कीर्तन झाले. मंदिरात श्री हनुमान जन्मोत्सवानिमित श्रींना रुद्राभिषेक करण्यात आल्याचे व्यवस्थापक माऊली वीर यांनी सांगितले. ह.भ.प वैराग्यमूर्ती जयरम महाराज भोसले यांच्या 13व्या स्मृति दिनानिमित्त समाधी पूजा, अभिषेक, महानैवेद्य झाला. यावेळी बाळासाहेब महाराज शेवाळे, नगरसेवक सागर भोसले आदि उपस्थित होते.