
हरयाणा मधील मुर्थाल येथे रविवारी सकाळी एका ढाब्याजवळ एका मद्य व्यावसायिकाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. हल्लेखोरांनी या व्यावसायिकावर तब्बल 35 गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.
सुंदर मलिक (38) असे त्या व्यावसायिकाचे नाव असून तो गोहानामधील सारगथळ येथील रहिवाशी होता. रविवारी सकाळी सुंदर गुलशन ढाबा येथे पार्किंगमध्ये त्याची एसयूव्ही गाडी लावून बाहेर पडत असतानाच दोन हल्लेखोरांनी त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. स्वत:चा बचाव करण्यासाठी सुंदरने एकाला पकडले मात्र दुसऱ्याने त्याच्यावर अंदाधुंद गोळ्या झाडल्या. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

























































