
माहीम स्थानकाजवळ एक लोकल रुळांवर घसरली आहे. या अपघातात सुदैवाने कुठलीही जिवीतहानी झालेली नाही. परंतु संपूर्ण हार्बर मार्गावरील सेवा ठप्प झाली आहे. यामुळे प्रवाशांचा चांगलाच खोळंबा झाला आहे.
माहीम स्थानकाजवळ सीएसएमटीहून वांद्र्याकडे जाणार्या लोकलचे चार डबे रुळांवर घसरले आहेत. सकाळी 11.28 मिनिटांनी हा अपघात झाला. त्यामुळे अंध्रेरी पनवेल लोकल सेवा ठप्प झाली आहे. ही सेवा पूर्ववत करण्यासाठी खूप वेळ लागेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.






























































