
सामना ऑनलाईन, अहमदाबाद
पटेल समाजाला शिक्षण, सरकारी नोकऱ्यामध्ये आरक्षण द्या, या मागणीसाठी निर्णायक लढा देणार असल्याची घोषणा पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी केली. या अंतिम लढाईसाठी आपण २५ ऑगस्टपासून येथे बेमुदत आमरण उपोषण करणार आहोत. एकतर मी माझे बलिदान देईन किंवा तुम्हाला आरक्षण मिळेल. त्यासाठी मला तुमचा पाठिंबा हवा आहे, अशी भावनिक साद त्यांनी आपल्या समाजबांधव, भगिनींना घातली आहे.
आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर हार्दिक यांनी एका व्हिडीओ संदेशातून ही माहिती दिली आहे. समाज बांधवांनी माझ्या पाठीशी उभे राहावे, असे कळकळीचे आवाहन हार्दिक यांनी या संदेशातून केले आहे.





























































