हरियाणा, ओडिशा उपांत्यपूर्व फेरीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

जेतेपदासाठी दावेदार असलेल्या हरियाणाने गोलांचा पाऊस पाडताना 14व्या हॉकी इंडिया सीनियर महिला राष्ट्रीय स्पर्धेत पूल ‘डी’ सामन्यात पुद्दुचेरीचा 22-0 असा धुक्वा उडवत दिमाखात उपांत्यपूर्व फेरी गाठली. ओडिशानेही कामगिरीत सातत्य राखत आगेकूच केली.

रविवारी ड्रगफ्लिकर दीपिकाने (चौथ्या, 11व्या, 14व्या, 15व्या, 42व्या आणि 49व्या मिनिटाला) हॅट्ट्रिकसह सहा गोल केले. याशिवाय हिंदुस्थानची आंतरराष्ट्रीय नवनीत काwर, नीलम, मोनिका, ज्योती, शर्मिला देवी, नेहा गोयल आणि उदिता यांनीही गोल करीत हॉकी हरियाणाचा विक्रमी विजय नोंदविण्यात मोलाचे योगदान दिले. हरियाणाने दोन सामन्यांतून तितक्याच विजयांसह पूल ‘डी’मध्ये अक्वल स्थान पटकावले.