इंग्लंडचा हॅरी केन ‘गोल्डन बूट’चा मानकरी

40

सामना ऑनलाईन । मॉस्को

रशियात झालेल्या फिफा वर्ल्ड कपमधील ३२ संघांच्या महासंग्रामात एकूण १६९ गोलचा पाऊस पडला. यात इंग्लंड संघाचा कर्णधार हॅरी केन याने सर्वाधिक सहा गोल करण्याचा पराक्रम केला. त्यामुळे यंदाच्या ‘गोल्डन बूट’चा तो मानकरी ठरला. याआधी १९८६ च्या फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडच्या गॅरी लिनेकेरने ‘गोल्डन बूट’ जिंकला होता. त्यानंतर तब्बल ३२ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हॅरी केनच्या रूपाने इंग्लंडने पुन्हा एकदा हा मानाचा ‘गोल्डन बूट’ मिळवला.

हॅरी केनने वर्ल्ड कपमध्ये सहा सामन्यांत सहा गोल केले. गटफेरीत सलामीच्या लढतीत हॅरी केनने टय़ुनियाशिविरुद्ध २ गोल केले. इंग्लंडचा दुसरा सामना पनामाशी झाली. या लढतीत इंग्लंडने ६-१ गोलफरकाने दणदणीत विजय मिळवला. हॅरी केनने या सामन्यात हॅटट्रिकचा पराक्रम केला. त्यानंतर बेल्जियमविरुद्धच्या तिसऱया सामन्यात केनशिवाय खेळणाऱया इंग्लंडला ०-१ अशी हार पत्करावी लागली. कोलंबियाविरुद्धच्या उप उपांत्यपूर्व सामन्यातही केनने पेनल्टी कॉर्नरवर गोल केला. त्यानंतर पेनल्टी शूटआऊटमध्येने हॅरी केनने गोल केला, मात्र त्यानंतर स्वीडन, क्रोएशिया व बेल्जियमविरुद्ध इंग्लंडच्या हॅरी केनला गोल करता आले नाही. ‘गोल्डन बूट’च्या शर्यतीत हॅरी केनला पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो (४), रशियाचा डेनिस चेरिशेव (४) आणि बेल्जियमचा रोमेलू लुकाकू (४) टक्कर देत होते. मात्र रोनाल्डोचा पोर्तुगाल संघ गटफेरीत बाद झाला, तर रशिया, बेल्जियमचे आव्हानही उपांत्य फेरीत संपुष्टात आले. फ्रान्सचे एंटोनियो ग्रिजमन व कायलियान एम्बाप्पे यांनी ३-३ गोल केले. आल्याने सहा गोलसह हॅरी केन आघाडीवर राहिला, अन् ‘गोल्डन बूट’चा मानकरी ठरला.

मागील चार ‘गोल्डन बूट’चे मानकरी

खेळाडू                   देश          गोल      वर्ल्ड कप
जेम्स रॉड्रिगेज         कोलंबिया       ६         २०१४
थॉमस मुलर            जर्मनी          ५         २०१०
मिरोस्लाव क्लोज       जर्मनी          ५         २००६
रोनाल्डो                 ब्राझील         ८         २००२

आपली प्रतिक्रिया द्या