
काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेल्या हर्षवर्धन पाटलांच्या विधानाने चर्चांना उधाण आले आहे. भाजपमध्ये मस्त निवांत आहे. भाजपमध्ये आल्यामुळे शांत झोप लागते. चौकशी नाही, काही नाही. मस्त वाटतंय, असे सहज विधान हर्षवर्धन पाटील करून गेले.
एका हॉटेलच्या उद्घाटनासाठी उपस्थित असलेले हर्षवर्धन पाटील म्हणाले, मला विचारणा झाली की, तुम्ही भाजपमध्ये का गेलात? त्यावर मी त्यांना म्हटलं, ते तुमच्या नेत्यालाच विचारा की, हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये का गेले? पण मी सांगतो, इथे मस्त निवांत आहे. भाजपमध्ये आल्यामुळे शांत झोप लागते. चौकशी नाही, काही नाही. मस्त वाटतंय’.


























































