
विधानसभा निवडणूक जाहीर होताच हरयाणात काँग्रेसमधील अंतर्गत मतभेत चव्हाट्यावर आले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तिकीटांवरून राज्यात चांगलीच बजबजपूरी माजली आहे. पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी तिकीट विकले असा आरोप कार्यकर्त्यांनी केला आणि दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या निवासस्थानाबाहेर चांगलाच गोंधळ घातला.
काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी तिकीट विकले असा आरोप माजी प्रदेशाध्यक्ष अशोक तन्वर यांनी केला. अनेक उमेदवारांना पैश्याच्या मोबदल्यात तिकीट दिले असा घणाघात त्यांनी केला. याचा निषेध म्हणून काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या निवासस्थानाबाहेर दाखल झाले. कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.




























































