
हरयाणातील फरिदाबादमध्ये एका जोडप्याचे मृतदेह सापडले आहे. यातील तरुणाने त्याच्या मित्राला प्रेयसीने मला प्रेमात धोका दिल्याचा मेसेज केला होता. तरुण आणि तरुणी दोघांनाही बंदुकीच्या गोळ्या लागलेल्या पोलिसांना दिसून आल्या आहेत. त्यामुळे या जोडप्याने आत्महत्या केली की त्यांची हत्या करण्यात आली असा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रियकराने त्याच्या मित्राला केलेल्या मेसेजमुळे त्याने आधी प्रेयसीची हत्या केली असावी आणि नंतर स्वत:देखील जीव दिला असावा असाही तर्क लढवण्यात येत आहे.
हरियाणाच्या फरीदाबाद येथील शिवाला कॉलनीत ही घटना घडली आहे. राहुल आणि प्रिया असं तरुण तरुणीचं नाव असून हे जोडपं एका भाड्याच्या घरात राहात होतं. याच घरात दोघांचे मृतदेह सापडले आहेत. दोघांनी आत्महत्या केल्याची माहिती घरमालकाने पोलिसांना दिली होती. दोघांचा मृत्यू गोळ्या लागल्याने झाल्याचं कळालं आहे. पोलिसांनी फॉरेन्सिक पथकाच्या मदतीने पुरावे गोळा करण्याच्या कामाला तातडीने सुरूवात केली. राहुल हा मथुरा येथील रहिवासी होता तर त्याची प्रेयसी प्रिया फरीदाबादची रहिवासी होती अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. राहुलने ज्या घरात आत्महत्या केली ते घर भाड्याने घेत असताना मालकाला सांगिलं होतं की त्याचा आणि प्रिया लवकरच साखरपुडा झाला असून लवकरच ते लग्न करणार आहेत. प्रिया रोज राहुलला भेटायला त्याच्या भाड्याच्या घरी येत होती. राहुल आमि प्रिया एकत्र गुडगांव मधील कंपनीत कामाला जात होते.
प्रिया रोज राहुलच्या घरी येत-जात असल्याने घरमालकाच्या कुटुंबियांच्याही ती परिचयाची झाली होती. कामावरून परतताना प्रिया राहुलसोबत नसायची. या दोघांचे मृतदेह मंगळवारी आढळून आले होते. सोमवारी घरमालक आणि त्याच्या घरचे बाहेर गेलेले असल्याकारणाने राहुलच्या घरी काय झालं हे कळू शकलं नाही. त्यामुळे या दोघांनी आत्महत्या केली का त्यांती हत्या करण्यात आली हे कळालेलं नाहीये. पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना घरात दोन देशी कट्टे दिसले. एक राहुलच्या हातामध्ये होता आणि दुसरा खोलीमध्येच पडलेला होता. पोलीस तूर्तास कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचलेले नाहीये. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर या प्रकरणी अधिकची माहिती मिळू शकेल असं पोलिसांनी म्हटलं आहे.

























































